चंद्रपूरच्या सुशीलाताई पुरेड्डीवार यांना दादासाहेब फाळके टेलिव्हिजन पुरस्कार…
शहरातील शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात सहभागी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणून नावारूपात आलेल्या सुशीला ताई पुरेड्डीवार यांना मुंबई येथील सहारा इंडिया हॉटेलच्या एका मोठ्या सभागृहात दादासाहेब फाळके टेलिव्हिजन पुरस्कार 2025 निमित्ताने Best Social Worker of the year 2025 देऊन मोठ्या सन्मानाने पुरस्कृत करण्यात आलं याबद्दल त्यांनी सगळ्यांचे धन्यवाद मानले. याप्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेल्या कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षण सीने अभिनेत्री जिया खान, तसेच सिने अभिनेत्री यामिनी मल्होत्रा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला व त्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. सुशीला ताई पुरेड्डीवार या अनेक वर्षापासून या क्षेत्रात सहभागी असून त्यांनी दिव्यांगासाठी जे सामाजिक कार्य केले आहे, आदिवासी महिलांसाठी, मुलींसाठी, मुलांसाठी त्यांचं त्यांनी दिलेले योगदान, या समस्त गोरगरीब जनतेला त्यांचं लागलेलं मार्गदर्शन आणि समाजासाठी काहीतरी करण्याची त्यांची जिद्द या सगळ्या गोष्टींचे फलित म्हणून त्यांना आज हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला. एक महिला असून स्वतःचं घर समाज दींदळीत दिव्यांग आदिवासी अशा लोकांसाठी स्वतःचं आयुष्य वेचणारी महिला हे खरंच प्रेरणास्थान असायला पाहिजे, महिला आज कुठल्या क्षेत्रात मागे नाही हे सुशीला ताई यांनी त्यांच्या कामगिरीतून खूप पणे बजावून सांगितला आहे आणि यासाठी ते त्यांच्या या संघर्षात पाठीशी खंबीरपणे उभा राहणाऱ्या परिवारातील सदस्यांचे खूप खूप आभार मानले.


February 18, 2026
Greeshma Pandya Dadasaheb Phalke and IIFA Award Winner 2026
Born and raised in Bengaluru Greeshma Pandya found her professional calling in the aesthetics and beauty industry, where her discipline, sincerity, and ability to connect with people earned her recognition while working with well-established brands....